गुरचरण जमिनीवर अतिक्रमण

गुरचरण जमिनीवर अतिक्रमण
Published on

गुरचरण जमिनीवर अतिक्रमण
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण ग्रामीण भागामध्ये भूमाफियांनी गुरचरण जमिनीवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. द्वारली पाडा परिसरातील गुरांच्या चरण्यासाठी राखीव असलेल्या जागेवर अनधिकृत चाळींचे पेव फुटल्याने संतापलेल्या तबेला चालकांनी आणि नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध अनोखे ‘गोबर खिलाव’ आंदोलन केले. आगामी १० दिवसांत ही अतिक्रमणे न हटवल्यास महापालिकेला तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

द्वारली पाडा येथील राखीव भूखंडावर भूमाफियांनी बेकायदेशीरपणे चाळी उभारल्यामुळे स्थानिक पशुपालकांसमोर गुरांना चरायला कुठे नेयचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. या गंभीर प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही महापालिका प्रशासन ढिम्म हलत नसल्याने, नागरिकांनी केडीएमसीच्या ''आय'' प्रभाग कार्यालयावर धडक दिली. १० दिवसांची मुदत: जर पुढील १० दिवसांत गुरचरण जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली नाहीत, तर लोकशाही मार्गाने अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशारा सौरभ पांडे आणि त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

प्रतीकात्मक निषेध
आंदोलनादरम्यान नागरिकांनी केडीएमसी आयुक्तांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला शेण चारत आणि आरती करत प्रशासनाचा निषेध केला. स्थानिक रहिवासी सौरभ सिंग यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात चक्क एक म्हैस सहभागी करण्यात आली होती. या म्हशीच्या पाठीवर ‘केडीएमसी कमिशनर’ असे लिहून प्रशासकीय दिरंगाईवर उपरोधिक टीका करण्यात आली. केवळ कागदोपत्री नोटीस देऊन प्रशासन भूमाफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

प्रशासनाची बाजू
संबंधित बांधकामांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा या बांधकामांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया ''आय'' प्रभागचे प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com