अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार

अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार
Published on

अपघातग्रस्तांना तातडीने उपचार
तलासरी, कासा रुग्णालयांत ट्रॉमा स्टॅबिलायझेशन सेंटर
तलासरी, ता. ८ (बातमीदार)ः तलासरी येथील ग्रामीण रुग्णालय, कासातील उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा स्टॅबिलायझेशन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सुविधेमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळणार आहेत.
डहाणू ते आच्छाड हा पट्टा अपघातप्रवण मानला जातो. या मार्गावरील मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’ने ‘ऑटो हँगर इंडिया प्रा. लि.’च्या सहकार्याने शून्य मृत्यू मार्ग उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला आहे. या नव्या सुविधेमुळे अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णांना आवश्यक प्राथमिक उपचार. जीवनावश्यक वैद्यकीय सेवा तत्काळ उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयांमध्ये श्वसनासाठी आवश्यक यंत्रणा, रक्तस्त्राव नियंत्रणासाठीची आधुनिक उपकरणे तसेच आपत्कालीन उपचारांसाठी सुविधा दिल्या आहेत.
-----------------------------
१०० ठिकाणांची निवड
मृत्यूदर कमी करण्यासाठी देशभरातील १०० महामार्गांवर धोकादायक ‘झीरो फॅटॅलिटी कॉरिडॉर’ उपक्रम राबवला जात आहे. याअंतर्गत रस्ते अभियांत्रिकी सुधारणा, नियमांची काटेकोर अंमलबजावणी, आपत्कालीन वैद्यकीय सेवांवर विशेष भर दिला जात आहे. पालघर जिल्ह्यातील रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणाने स्थानिक नागरिकांसह महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---------------------------------
या अद्ययावत सुविधांमुळे गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अपघाती मृत्यू कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. प्रभाकर भोये, वैद्यकीय अधीक्षक, तलासरी ग्रामीण रुग्णालय
---------------------
रस्ते अपघातांमधील बहुतांश मृत्यू वेळेवर उपचार नसल्यामुळे होतात. त्यामुळे स्थानिक रुग्णालये सक्षम करणे अत्यंत आवश्यक होते.
- पियुष तिवारी, संस्थापक, सेव्ह लाइफ फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com