

बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी व ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (एसआयआर) प्रक्रियेबाबत मार्गदर्शन कार्यक्रम कुळगाव-बदलापूर नगरपालिका सभागृहात उत्साहात पार पडला. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन केले. शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त ठेवण्यासाठी एसआयआर मोहीम अत्यंत प्रभावी ठरत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून नोंदणी करणे ही लोकशाहीची मूलभूत जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, मतदार यादीतून नाव वगळणे, स्थलांतर नोंदणी आदी बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले. ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ ही अल्प कालावधीत राबविण्यात येणारी व्यापक प्रक्रिया असून, मतदार यादीतील त्रुटी दूर करून अधिकाधिक नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेणे हा तिचा मुख्य उद्देश असल्याची माहिती देण्यात आली. या वेळी अर्ज भरण्याची पद्धत, ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून, अधिकाधिक नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.