मुलुंडमधील अतिक्रमणे हटवली

मुलुंडमधील अतिक्रमणे हटवली
Published on

मुलुंडमधील अतिक्रमणे हटवली
पालिकेच्या कारवाईमुळे रस्त्यांना मोकळा श्वास
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः मुलुंड पश्चिमेतील आर.आर.टी. रोड आणि एस.एल. रोड परिसरात पालिकेच्या टी वॉर्डकडून अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले रस्ते अखेर नागरिकांसाठी मोकळे झाले आहेत.
आर.आर.टी. रोड हा मुलुंड पश्चिमेतील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग असून, गेल्या पाच ते सहा दशकांपासून या भागात पदपथ व रस्त्यांवर भाजीविक्रेते व इतर फेरीवाले व्यवसाय करत होते. परिणामी, संपूर्ण परिसर अनधिकृत विक्रेत्यांनी व्यापला गेला होता आणि रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. स्थानिक नागरिकांकडून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या.
पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने यापूर्वीही अनेकदा कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पथक येताच फेरीवाले तात्पुरते हटत आणि कारवाई संपल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू करत. त्यामुळे समस्या कायम होती. अखेर पोलिस बंदोबस्तात नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवण्यात आली. आर.आर.टी. आणि एस.एल. रोडवरील सर्व अनधिकृत अतिक्रमण हटवून रस्ते व पदपथ पूर्णतः मोकळे करण्यात आले. या कारवाईमुळे वाहतुकीला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अतिक्रमण हटवल्यामुळे वाहतूक सुरळीत होईल तसेच वेळ आणि इंधनाची बचत होईल. मोकळ्या रस्त्यांचा नागरिकांना निश्चितच फायदा होईल, असा विश्‍वास मुलुंड वाहतूक विभागाचे वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक महेश तांबे यांनी दिली.
ही संपूर्ण मोहीम टी विभागाच्या सहाय्यक आयुक्त योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अतिक्रमण हटवल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

कारवाई सुुरूच राहणार
आर.आर.टी. रोड आणि एस.एल. रोड येथील अनधिकृत अतिक्रमणे महापालिकेने हटवली असून, यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरूच राहील. ही मोहीम तात्पुरती नसून जिथे जिथे अतिक्रमणे असतील, ती टी विभागाकडून हटवली जातील, अशी प्रतिक्रिया नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com