

नागरी समस्यांवरून प्रशासन धारेवर
नायगावकरांकडून १२ एप्रिलपर्यंतची मुदत
विरार, ता. ८ (बातमीदार)ः नायगाव परिसरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय कारभाराचा निषेध करताना साई दुर्गा मित्र मंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. या वेळी उद्याने, क्रीडांगणे, कलादालने नंतर द्या, पण मूलभूत गरजा पूर्ण करा, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली.
टिवरी फाटा ते भोयदापाडा रस्त्याचे काम ठेकेदाराला देऊनही काम झालेले नाही. तसेच जूचंद्र गावातील माता बालसंगोपन केंद्र ते हसोबानगर रस्ता, सेव्हन इलेव्हन शाळा ते महालक्ष्मी रस्ता, परेरा नगर, स्टार सिटीमधील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी नवीन निविदा काढून कामे सुरू करावीत. रस्ते कामासोबतच आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, उपायुक्त अर्चना दिवे यांच्या भेटीत जूचंद्र, परेरा नगर आणि स्टार सिटी भागात नियमित कचरा उचलला जात नसल्याची तक्रार करण्यात आली. या वेळी नाल्यांची स्वच्छता करणे, डास निर्मूलनासाठी औषध फवारणी वाढवण्यावर कार्यवाहीचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
-------------------------
आंदोलकांच्या मागण्या
जूचंद्र गावातील जुने खांब बदलून त्या ठिकाणी पांढरे पथदिवे लावणे, किणी नाका, सेव्हन इलेव्हन शाळा, रखा दादा मंदिरस वेलनकणी शाळेसारख्या गर्दीच्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसवण्याची मागणी विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल जाधव यांच्याकडे करण्यात आली, तर नायगाव ठाणे ते चिंचोटी कामन, भोयदापाडा मार्गावर नवीन इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी परिवहन व्यवस्थापक जाधव यांना निवेदन देण्यात आले.
------------------------------
मागण्यांची पूर्तता होईपर्यंत साई दुर्गा मित्र मंडळाचा पाठपुरावा सुरूच राहणार असून, प्रशासनाने दिलेला शब्द न पाळला नाहीतर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- चेतन घरत, आंदोलक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.