डोंबिवली पश्चिमेतही दुय्यम निबंधक कार्यालय

डोंबिवली पश्चिमेतही दुय्यम निबंधक कार्यालय
Published on

डोंबिवलीत स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालय
आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : डोंबिवली पश्चिम परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर मार्गी लागली आहे. वाढते शहरीकरण आणि नागरिकांची होणारी ओढाताण लक्षात घेऊन डोंबिवली पश्चिमेला स्वतंत्र ‘दुय्यम निबंधक कार्यालय’ सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, १ एप्रिल रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

सध्या डोंबिवलीसाठी केवळ पूर्वेलाच ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पश्चिमेकडील लोकसंख्या आणि मालमत्ता नोंदणीचे प्रमाण पाहता, नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडून पूर्वेला जावे लागत असे. यामुळे पूर्वेकडील कार्यालयावरही कामाचा मोठा ताण येत होता. नवीन निर्णयामुळे हा ताण कमी होऊन पंचक्रोशीतील नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. विभागाच्या कार्यासन अधिकारी प्राची पालव यांनी हे आदेश दिले आहेत. नवीन कार्यालयामुळे पूर्वेकडील दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी विभागली जाईल, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल. ज्याप्रमाणे पश्चिमेला स्वतंत्र शिधावाटप केंद्र देण्यात आले, त्याच धर्तीवर हे कार्यालयही कार्यान्वित होणार आहे. वाढत्या कामाच्या बोजामुळे त्रस्त असलेल्या महसूल विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही या विभाजनामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील नागरिकांना साध्या नोंदणी कामासाठीही पूर्वेला जावे लागत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही महसूल विभाग आणि राज्य सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता. शासनाने आमच्या मागणीची दखल घेत नवीन कार्यालय मंजूर केले आहे. यामुळे पश्चिमेकडील नागरी सुविधांमध्ये मोठी भर पडली असून, लवकरच हे कार्यालय प्रत्यक्षात सुरू होईल.
- रवींद्र चव्हाण, आमदार, भाजप प्रदेशाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com