वाढत्या महागाईने दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण

वाढत्या महागाईने दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण
Published on

पशुपालकांवर कर्जाचा डोंगर
युद्धामुळे आहार महागला, जनावरांना सांभाळणे कठीण
जव्हार, ता. ८ (बातमीदार)ः शेतीला जोडधंदा म्हणून तरुणांचा कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायाकडे कल आहे. या व्यवसायामुळे स्थलांतर कमी होऊन रोजगार उपलब्ध झाला आहे. पण युद्धामुळे पाळीव जनावरांचा आहार महागल्याने आर्थिक गणित साकारताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
तालुक्यात ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. पशुखाद्याचे दर झपाट्याने वाढले असूनही दुधाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. येथील दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक, जोडव्यवसाय करत आहे. अनेकांचे अर्थकारण व्यवसायावर अवलंबून असते. पशुगणनेनंतर हा आकडा नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात म्हैस, संकरित गायीचे प्रमाण अधिक आहे, पण पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत.
----------------------------
व्यवसाय तोट्यात
वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा दर अत्यंत कमी आहे. सध्या म्हशीच्या दुधाचा दर फॅटनुसार किमान ६० रुपये प्रतिलिटर, तर गायीच्या दुधाचा दर किमान ५० रुपये प्रतिलिटर आहे. पशुखाद्याच्या वाढत्या किमतींच्या तुलनेत हे भाव अगदी अपुरे असून, दुग्धव्यवसाय तोट्यात जाण्याची भीती आहे.
-------------------------
पशुखाद्यांचे भाव
कडबा सिंगल कट्टी - २,५०० ते २,८००
मुरघास - ८,००० ते १०,००० प्रति टन
सरकी पेंड - १,२०० ते १,४०० प्रति ४० किलो
शेंग पेंड - १,३००ते १,७०० प्रति ४० किलो
मका काटा - १,१५० प्रति ४५ किलो
--------------------------
युद्धजन्य परिस्थितीमुळे पशुखाद्य महागले आहे. मात्र, दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने खर्चाचा ताळमेळ घालणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे जनावरांच्या देखभालीने मेटाकुटीला आलो आहे.
- आकाश शिरसाट, दुग्ध व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com