......................

......................
Published on

फुप्फुस प्रत्यारोपणातून महिलेला जीवदान

मुंबई ः द्विपक्षीय फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे ५६ वर्षीय महिलेचा जीव वाचवण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आले आहे. या रुग्णाला वेळेवर उपचारांमुळे रुग्णाला नवजीवन मिळाले आहे.
सुलेखा कोठारी यांना न्युमोनियामुळे श्वसनाचा त्रास होत होता. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान गंभीर संसर्ग होऊन फुप्फुस निकामी होण्याची स्थिती निर्माण झाली. फुप्फुसांची कार्यक्षमता झपाट्याने घटत असल्याने डॉक्टरांनी दोन्ही फुप्फुसांचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतरही अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्रगत उपचारांच्या मदतीने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com