महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक
Published on

विकासकामांना गती देण्यासाठी आढावा बैठक
प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचे महापौरांचे आदेश

विरार, ता. ९ (बातमीदार) : वसई़-विरार महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या विविध लोककल्याणकारी व विकासकामांना गती देण्यासाठी महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ८) महापालिका मुख्यालयात विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
शहराच्या विकास प्रकल्पांची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा लवकरात लवकर मिळावी, हा या बैठकीचा मुख्य हेतू होता. मागील कार्यकाळात झालेल्या सभांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर विविध ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर विषयांच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर सध्या काय कार्यवाही सुरू आहे, याचा थेट आढावा यावेळी घेण्यात आला.

मंजूर झालेल्या प्रस्तावांपैकी कोणते प्रस्ताव निविदा स्तरावर आहेत, किती कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहेत, प्रस्तावांची सद्दःस्थिती याची सविस्तर माहिती या वेळी घेण्यात आली. निविदा प्रक्रिया आणि कार्यादेश स्तरावर प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश महापौरांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. काही कामात येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींवर या वेळी चर्चा करून त्या तत्काळ सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध आराखडा या वेळी निश्चित करण्यात आला. प्रशासकीय दिरंगाई टाळून विकासकामांना वेग देण्यासाठी आणि मंजूर निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर अजीव पाटील, उप-महापौर मार्शल लोपीस, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, महापालिकेचे सर्व अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com