ग्रामीण भागात खारवड्या, कुरडई, पापड करण्याची लगबग

ग्रामीण भागात खारवड्या, कुरडई, पापड करण्याची लगबग
Published on

ग्रामीण भागात कुरडई, पापड करण्याची लगबग
ऊन वाढू लागल्याने गृहिणी लागल्या कामाला

वाडा, ता. ९ (बातमीदार) : मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत खारवड्या, कुरडई, पापड, बटाटा वेफर्स, शेवया इत्यादी उन्हाळ्यात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची लगबग ग्रामीण भागातील महिलांमध्ये दिसत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून, तळणीचे विविध पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग दिसत आहे.

या शेतीप्रधान देशात खारवड्या, कुरडई, बटाटा वेफर्स, शेवया, पापड हे पदार्थ खास प्रक्रिया करून भारतीय पद्धतीनुसार वाळवून पुढे वर्षभर वेगवेगळ्या सणावारांना खाण्याची प्रथा आहे. खारवड्या, कुरडई हेही असेच प्रकार असून ते कुरकुरीत करण्याची पद्धत ही कष्टदायी व मेहनतीची आहे. त्यासाठी दोन दिवस तांदूळ भिजत ठेवणे, मग ते ओले तांदूळ पुन्हा सुकवणे, सुकवलेले तांदूळ दळूण घेणे तसेच दळलेले पीठ गरम पाण्यात शिजवून घेत, मग अंगणात प्लॅस्टिकच्या कागदावर चमच्याच्या सहाय्याने खारवड्या टाकून सुकविण्याची प्रक्रिया केली जाते. कुरडईसाठी मात्र साच्याचा वापर केला जातो. त्यानंतर किमान दोन ते तीन दिवस या गोष्टींना कडक ऊन दाखवले जाते.

अशाच पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या शेवया, उडीद पापड, ज्वारी नांगली, साबुदाणा यांचे पापड तयार केले जातात. सध्या वाड्याप्रमाणेच अनेक ग्रामीण भागातील महिलांची लगबग हे पदार्थ बनवण्यासाठी सुरू असल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com