अंगणवाडीसेविकांच्या प्रतीक्षेचा अंत

अंगणवाडीसेविकांच्या प्रतीक्षेचा अंत
Published on

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ९ : कुपोषण निर्मूलन आणि बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची धुरा वाहणाऱ्या अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांना अखेर दिलासा मिळाला आहे. तीन महिन्यांपासून रखडलेला केंद्र सरकारचा मानधनाचा हिस्सा अखेर खात्यावर जमा झाला आहे. मात्र, याच आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशासेविकांचे मानधन अद्याप रखडलेलेच असल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहापूर तालुक्यात ४२० आशासेविका आहेत. त्यांचे डिसेंबरपासूनचे मानधन रखडले आहे.

तीन महिन्यांपासून केंद्र सरकारने आपल्या वाट्याची रक्कम राज्य सरकारकडे वर्ग केली नव्हती. त्यातच मानधन वितरणासाठी सरकारने नवी ‘स्पर्श’ प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि केंद्राकडून डेटा अपडेट होण्यास विलंब झाल्याने महिला कर्मचाऱ्यांची होरपळ होत होती. अखेर २७ व २८ मार्चपासून अंगणवाडीसेविकांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली. अंगणवाडीसेविकांना केंद्र सरकारकडून ४५००, तर राज्य सरकारकडून ८५०० असे एकूण १३ हजार मिळतात. तर मदतनीस, आशासेविकांना केंद्राकडून ३५०० आणि राज्य सरकारकडून चार हजार असे एकूण ७५०० रुपये मिळतात. आशासेविकांच्या डिसेंबरपासून रखडलेल्या मानधनाचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर केले आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे यांनी सांगितले.

कामाचा डोंगर
अंगणवाडीसेविकांना केवळ बालकांचा आहारच नाही तर लसीकरण, गृहभेटी, गर्भवती मातांची नोंदणी आणि विविध प्रकारचे सर्वेक्षण करावे लागते. अनेकदा ही ऑनलाइन माहिती भरण्यासाठी २४ तास उपलब्ध राहावे लागते. एवढी मेहनत करूनही वेळेवर वेतन नसल्याने आधीच कामाचा डोंगर, त्यात मेहनताना मिळेना, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

स्पर्श ठरतेय डोकेदुखी
सरकारने पारदर्शकतेसाठी स्पर्श प्रणाली आणली खरी; परंतु ती कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नवीन तंत्रज्ञान सोयीचे ठरण्याऐवजी तांत्रिक चुकांमुळे हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसल्याची तक्रार कर्मचारी संघटनांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com