डहाण तालुक्यातील प्रयोगशील बागायतदार काळाच्या पडद्याआड

डहाण तालुक्यातील प्रयोगशील बागायतदार काळाच्या पडद्याआड
Published on

प्रयोगशील बागायतदार काळाच्या पडद्याआड
रुस्तम इराणी यांचे निधन

बोर्डी, ता. ९ (बातमीदार) : डहाणू येथील पारशी समाजातील प्रयोगशील बागायतदार रुस्तम के. इराणी (मेसर्स बोमन इन्टरप्राईसेस, डहाणू रोड) यांचे मंगळवारी (ता. ७) निधन झाले. आपण आधुनिक शास्त्रज्ञाला मुकलो, अशी खंत महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.

रुस्तम इराणी हे १९७०-७१ दरम्यान पुणे येथून डहाणू मुक्कामी स्थायी झाले. ते अत्यंत शांत, सुस्वभावी आणि प्रेमळ तसेच समाजातील गोरगरीब घटकाशी आदर, संयमाने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. शेतीच्या क्षेत्रामध्ये विशेषतः चिकू पिकामध्ये खूप मेहनत घेत अनेक प्रयोग करून चिकू फळाची प्रत सुधारणे, चिकू झाडांना खत व पाण्याचे योग्य नियोजन करण्यासंदर्भात ते तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असत. तसेच बंगळूर येथील व्ही. एस. टी. पॉवर टिलर कंपनीचे छोटे ट्रॅक्टर १९७४-७५ च्या काळात आणले. कालांतराने या छोट्या पॉवर टिलरची मागणी खूपच वाढत गेली.
भातलागवडीच्या कामात मजुरांची टंचाई भासत असल्यामुळे हे पॉवर टिलर शेतकऱ्यांसाठी फार मोठे वरदान ठरले. महाराष्ट्र शासनाने ते पॉवर टिलर २५ टक्के अनुदानातून देण्याची योजना जाहीर केली. विशेष म्हणजे मजुरांच्या टंचाईवर एक आधुनिक योजनेच्या माध्यमातून गरीब, होतकरू घटकाला त्याचा खूपच लाभ होत आहे. आज हे पॉवर टिलर आदिवासी गरीब शेतकऱ्यांचा फार मोठा आधार आणि प्रगतीचे साधन बनले आहे. त्यांच्या निधनानंतर एक प्रयोगशील बागायतदार काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत शेतीतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com