

पोयनाड नाक्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची भीती
पोयनाड, ता. ९ (बातमीदार) : पोयनाड ही रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ असल्यामुळे पोयनाड नाक्यावर नेहमीच वर्दळ असते. मात्र, या पोयनाड नाक्याजवळ अलिबाग आणि पेणच्या दिशेने गतिरोधक नसल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
आता पेण-अलिबाग राज्यमार्ग हा रस्ता चांगल्या स्थितीत झालेला आहे. दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, पोयनाड बाजारपेठेत येणारे ग्राहक, अवजड वाहने, एसटी बस, रिक्षा यांची मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ वाढलेली आहे. येथे जवळच मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची ये-जा असते, तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेस पेणकडून अलिबागच्या दिशेने भरधाव वेगात वाहने येतात, कोणताही दिशादर्शक फलक अथवा गतिरोधक नसल्याने येथे बाजारपेठ किंवा वर्दळीचे ठिकाण असल्याचे अंदाज येत नाही.
पोयनाड नाक्यावर गतिरोधक नसल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे दिवसा किंवा रात्रीच्या वेळेस येथे अपघात होण्याची वर्तवली जाते आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यामध्ये लक्ष घालून गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.
छायाचित्र :
पोयनाड : वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या पोयनाड नाक्यावर गतिरोधकांची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.