मैत्रिणीबरोबर बोलल्याच्या रागाने हल्ला

मैत्रिणीबरोबर बोलल्याच्या रागाने हल्ला
Published on

पनवेल, ता. ९ (वार्ताहर) : मैत्रिणीशी बोलतो याचा राग मनात धरून एका तरुणाने त्याच्या ओळखीतील १७ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना कामोठ्यात घडली आहे. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. कामोठे पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल सुरू केला आहे.

या घटनेत जखमी तरुण कामोठे येथे, तर त्याच्यावर चाकूने वार करणारा संशयित आरोपी खारघर येथे राहण्यास आहे. हे दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. आपल्या मैत्रिणीसोबत वारंवार बोलत असल्याचा राग गेल्या काही दिवसांपासून तरुणाच्या मनात होता. याच विषयावर ''चर्चा'' करण्यासाठी तरुणाने मुलाला कामोठे सेक्टर ३५ मधील झुडिओ शॉपसमोर बोलावले होते. रविवारी (ता. ५) दुपारी दोघे झुडिओ शॉपसमोर भेटले. या वेळी दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र रागाच्या भरात तरुणाने मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलाने त्याला प्रतिकार केला असता, तरुणाने खिशातून चाकू काढून त्याच्या पाठीवर आणि डाव्या हातावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणात संशयिताला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com