

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : भिवंडी शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी तब्बल १६ इच्छुकांनी अर्ज खरेदी केल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा हरियाणातील आमदार मामन खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी विद्यमान शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमिन यांच्यासह शहरातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हास्तरीय अध्यक्ष निवडीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरून निरीक्षकांची नियुक्ती केली असून, ते स्थानिक पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत. भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पुनर्गठन करण्याच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून मामन खान मंगळवारी भिवंडीत दाखल झाले. यावेळी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमिन व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. संघटना पुनर्गठन प्रक्रियेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाशी निष्ठावान राहून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच शहराध्यक्षपदासाठी पात्र ठरतील, असेही मामन खान यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.