

पालिका रुग्णालयांची झाडाझडती
महापौर, उपमहापौर यांच्याकडून पाहणी
भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेच्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयाला महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी भेट दिली. या वेळी अनुभवी डॉक्टरांच्या कमतरतेसह अनेक सुविधांची वानवा असल्यामुळे रुग्णांची गैरसोय उघड आली.
दहिसर चेकनाक्याजवळ पालिकेच्या नाट्यगृहालागत कॅशलेस रुग्णालय आहे. या रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य सुविधा योनेतून अनेक गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात. या रुग्णालयाला महापौर, उपमहापौर यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान रुग्णालयात अनुभवी डॉक्टरांची कमतरता दिसून आली. शिवाय छोट्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना ताटकळत ठेवले जात असल्याच्या तक्रारी महापौरांकडे करण्यात आल्या.
--------------------
रुग्णालयासंदर्भात तक्रारी प्राप्त होत असल्याने भेट देऊन पाहणी केली. संबंधितांची तातडीने बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
- ध्रुवकिशोर पाटील, उपमहापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.