

मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : अभिजित देसाई
शौचालये, जुनी इमारती आणि पर्यावरणपूरक अंत्यविधींचा मुद्दा सभागृहात
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : शहरातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी सभागृहात नागरिकांच्या समस्या ठळकपणे मांडल्या. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, सिडकोच्या जुन्या इमारतींची जीर्ण अवस्था आणि पर्यावरणपूरक अंत्यविधी सुविधांचा अभाव या मुद्द्यांकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
शहरातील अनेक सार्वजनिक शौचालये मोडकळीस आल्याने स्वच्छता व देखभाल अत्यंत निकृष्ट झाली असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी निधी वाढवून तातडीने दुरुस्ती व नियमित स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच, सिडकोच्या ३० ते ४० वर्षे जुन्या इमारतींची अवस्था चिंताजनक असून ५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दुरुस्तीसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी अर्थसंकल्पात १०० ते १५० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणीही त्यांनी केली.
पर्यावरणाच्या दृष्टीने, पारंपरिक अंत्यविधीत मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर होत असल्याने प्रदूषण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
स्मशानभूमींमध्ये गॅस व विद्युतदाहिनीची गरज
शहरातील सर्व २३ स्मशानभूमींमध्ये गॅस व विद्युतदाहिनी कार्यान्वित करून त्यांचा प्रत्यक्ष वापर सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.