तटकरे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली १०० जणांची आरोग्य तपासणी

तटकरे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली १०० जणांची आरोग्य तपासणी
Published on

जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा
तटकरे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली १०० जणांची आरोग्य तपासणी
माणगाव, ता. ९ (वार्ताहर) ः आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी याकरीता जागतिक आरोग्य दिन गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत हा दिवस केवळ औपचारिकतेपुरता न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव अशोक साबळे यांनी भूषविले. प्राचार्या मेहरोश सनगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आरोग्य तपासणी उपक्रम राबवत नाडी, रक्तदाब व साखर यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या केल्या. या उपक्रमामुळे सहभागी व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. या शिबिरामध्ये राजीव साबळे यांनी स्वतः सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. तसेच नर्सिंग कॉलेज, विधी महाविद्यालय व द. ग. तटकरे महाविद्यालयातील कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या मेहरोश सनगे, सायली भक्कम, रश्मी जाधव, सोहम पोवार, स्वप्नील खाडे, वैभव पाटील आणि अनघा गमरे यांनी मोलाचे योगदान देत कार्यक्रमाच्या यशात मोठा वाटा उचलला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com