

साखरे गावाजवळ धावत्या बसचे छत अर्धवट उडाले
जव्हार, ता. ९ : जुनी व देखभालीअभावी धोकादायक बनलेल्या बसमुळे प्रवाशांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत असल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जव्हार-वसई मार्गावरील बस साखरे गावाजवळ गुरुवारी दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास धावत असताना जोरदार वाऱ्यामुळे बसचे छत अर्धवट उडाल्याची घटना घडली.
या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नसून बसची अवस्था आधीपासूनच जीर्ण व निकृष्ट असल्याचे प्रवाशांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी संताप व्यक्त करीत परिवहन विभागाच्या दुर्लक्षावर तीव्र टीका केली आहे. भंगार अवस्थेतील बस रस्त्यावर धावत असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जुनी व धोकादायक वाहने त्वरित सेवेतून हटवावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
ही बस जव्हार आगाराची नव्हती. बसचे छत उडाल्याचे प्रवाशांकडून समजले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
- बाळासाहेब झरीकर, आगार व्यवस्थापक, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.