

डिजिटल जनगणना २०२७ साठी नमुंमपा सज्ज
मुख्यालयात फिल्ड ट्रेनर्सना सखोल प्रशिक्षण
वाशी, ता. ९ (बातमीदार) : भारत सरकारच्या लोकसंख्या जनगणना २०२७च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली असून, मुख्यालयात सखोल प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. यंदा प्रथमच जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असल्याने या प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान घरगणना होणार आहे. त्याआधी १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वगणनेचा पर्याय उपलब्ध असेल. या माध्यमातून नागरिकांना वेब पोर्टलवर स्वतःची माहिती भरता येणार आहे.
६ ते ११ एप्रिलदरम्यान झालेल्या प्रशिक्षणात ४५ फिल्ड ट्रेनर्सना मार्गदर्शन करण्यात आले. पुढे हे प्रशिक्षक सुमारे ३,१०० प्रगणकांना प्रशिक्षण देणार आहे. डिजिटल प्रणालीमुळे जनगणना अधिक अचूक, पारदर्शक व वेगवान होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.