

ऐरोलीत प्रथम संदर्भ रुग्णालय उभारण्याचा निर्णय
आरोग्यसेवांसाठी २१९ कोटींची भरीव तरतूद
तुर्भे, ता. ९ (बातमीदार ) : शहरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने आगामी अर्थसंकल्पात तब्बल २१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये ऐरोली येथे अत्याधुनिक प्रथम संदर्भ रुग्णालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, घणसोली येथेही नवीन रुग्णालयाला प्राधान्य देण्यात आले आहे.
सध्या वाशी येथे प्रथम संदर्भ रुग्णालय कार्यरत असले तरी वाढता रुग्णभार लक्षात घेता ऐरोली, घणसोली आणि दिघा परिसरातील नागरिकांना मोठा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ऐरोलीतील विद्यमान माता-बाल रुग्णालयाच्या जागेवरच नवीन रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी प्रारंभी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पुढील टप्प्यात निधी वाढवला जाणार आहे.
हृदयविकार आणि मेंदूविकारांवरील तातडीच्या उपचारांसाठी वाशी व ऐरोली येथे द्विस्तरीय कॅथलॅब उभारण्याची योजना आहे. यामुळे अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसारख्या उपचारांसाठी नागरिकांना तत्काळ सुविधा उपलब्ध होणार आहेत. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी या निर्णयामुळे आरोग्यसेवांचा दर्जा उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.
चौकट
वाशी रुग्णालयावरील ताण कमी होणार
ऐरोलीत नवीन प्रथम संदर्भ रुग्णालय उभारल्यामुळे वाशी रुग्णालयावरील वाढता ताण कमी होऊन स्थानिक स्तरावरच नागरिकांना जलद व दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.