

होर्मुझमधून जेएनपीएमध्ये ‘ग्रीन आशा’चे आगमन
एलपीजी वाहतूक सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : इराण, अमेरिका आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. ‘ग्रीन आशा’ हे भारताच्या ध्वजाखालील एलपीजी वाहतूक करणारे जहाज होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करून जेएनपीए (जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण) बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले आहे.
बीपीसीएल-आयओसीएलच्या द्रव कार्गो बर्थवर या जहाजाने नांगर टाकला. विशेष म्हणजे इराण-अमेरिका-इस्राईल संघर्ष सुरू झाल्यानंतर जेएनपीएमध्ये दाखल होणारे हे पहिले एलपीजी जहाज ठरले आहे. या जहाजातून सुमारे १५ हजार ४०० मेट्रिक टन एलपीजीची वाहतूक करण्यात आली आहे. जहाज, त्यावरील माल तसेच सर्व खलाशी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती बंदर प्रशासनाने दिली. या घटनेमुळे जागतिक स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीतही सागरी वाहतूक व्यवस्था सक्षमपणे कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तसेच देशातील एलपीजीचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी बंदरे आणि सागरी वाहतूक यंत्रणा प्रभावीपणे काम करीत असल्याचेही अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, या जहाजाच्या सुरक्षित आगमनामुळे ऊर्जा पुरवठा साखळीला मोठा दिलासा मिळाला असून, अत्यावश्यक इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.