

थोडक्यात
शिल्प चौक पदपथावर अतिक्रमण (फोटो बातमी)
खारघर (बातमीदार ): खारघरमधील शिल्प चौक परिसरात पदपथ व रस्त्यांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. कचरा कुंड्या भरून वाहत असल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. ॲड दत्तराज शिरवडकर यांनी पालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
----------------------------------------------
सुप्रित कोळी यांना एमबीए पदवी प्रदान
तुर्भे (बातमीदार ) : तुर्भे येथील सुप्रित चंद्रकांत कोळी यांना एमबीए पदवी प्रदान करण्यात आली. सामान्य कुटुंबातून येत त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. डी.वाय. पाटील कॉलेज येथे शिक्षण घेत त्यांनी अनेक अडचणींवर मात केली. त्यांच्या यशामुळे कुटुंबासह दिवाळे कोळीवाडा परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. सुप्रित यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, परिस्थितीवर मात करून मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, हा संदेश त्यांनी दिला आहे.
------------------------------------------------
मनपा मुख्यालयात मनसेचे नूतन दालन
नेरूळ(बातमीदार): बेलापूर येथील नवी मुंबई मनपा मुख्यालय येथे मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई यांच्या दालनाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी रिता गुप्ता, मनोज चव्हाण, संजीव नाईक, गजानन काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे विशाल ससाणे व विशाल विचारे यांनीही हजेरी लावली. दालनातील राज ठाकरे यांच्या छायाचित्रामुळे शर्मिला ठाकरे भावूक झाल्या. कार्यक्रमानंतर महापौर सुजाता पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
--------------------------------------------------------
बेलापूर मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळा
नेरूळ (बातमीदार): बेलापूर विधानसभा मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसनविषयक कार्यशाळेचे आयोजन ११ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने सुनील गावस्कर मैदान येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यशाळेत शासकीय अधिकारी, तज्ञ, लोकप्रतिनिधी व नागरिक सहभागी होणार आहेत. पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि उपाययोजनांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पारदर्शकता, गती आणि नागरिकांचा विश्वास वाढविण्यावर भर देण्यात येणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.