

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा
सामाजिक न्याय विभागाकडून १.४६ कोटींचा निधी मंजूर
भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६ फुटी पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीस गती मिळाली आहे. पुतळा उभारणीसाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने मिरा-भाईंदर महापालिकेला एक कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील सहा महिन्यांत पुतळा उभारणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या दालनात यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरा रोड येथील मौजे घोडबंदर, सर्व्हे क्र. २३३ या जागेवर बाबासाहेबांच्या लंडनमधील स्मारकाच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील पहिले भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मिरा-भाईंदर शहरात साकारले जात आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासह बहुउद्देशीय इमारत उभारण्यासाठी सुरुवातीला सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही मंजूर करण्यात आला.
आंबेडकरी अनुयायांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी १६ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे २०० चौ. मीटर जागेची आवश्यकता असून, ती सामाजिक न्याय विभागाकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे मिरा-भाईंदर परिसरात लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारणीस गती मिळणार असल्याचा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.