राज्यातील बाजार समित्या होणार डिजिटल: शरद जरे

राज्यातील बाजार समित्या होणार डिजिटल: शरद जरे
Published on

शरद जरे यांची पणन संचालकपदी नियुक्ती
राज्यातील ३०७ बाजार समित्यांच्या डिजिटायझेशनला गती

जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामकाजात पारदर्शकता व शिस्त आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत राज्य सरकारने शरद जरे यांची पणन संचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील तब्बल ३०७ बाजार समित्यांच्या डिजिटायझेशनला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे प्रशासकीय इमारतीत जरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी शिस्तबद्ध व कार्यक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. बाजार व्यवस्थापन अधिक पारदर्शक, आधुनिक आणि शेतकरी-केंद्रित करण्यावर भर देणार असल्याचे शरद जरे यांनी स्पष्ट केले. कांदा-बटाटा मार्केट, मसाला मार्केटसारख्या धोकादायक अवस्थेतील इमारती तसेच रखडलेले प्रकल्प व्यापारी व संचालक मंडळाच्या सहकार्याने लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
समित्यांच्या स्टाफिंग पॅटर्नमध्ये आयटी, कृषी व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञांना कंत्राटी पद्धतीने संधी दिली जाणार आहे. तसेच अनावश्यक खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. शेतकरी हित, पारदर्शकता आणि आधुनिकतेच्या दिशेने बाजार समित्यांमध्ये व्यापक बदल घडवून आणण्यासाठी शरद जरे यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

खासगी व्यवहारांवर देखरेख
राज्यातील खासगी बाजार व थेट पणन परवान्यांद्वारे होणाऱ्या व्यवहारांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, या व्यवहारांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होतो का, याचा आढावा जिल्हा उपनिबंधकांमार्फत घेतला जाणार आहे.

बोगस अडत्यांवर कारवाईचा इशारा
मुंबई व पुणे बाजार समित्यांमध्ये परवाना नसताना व्यवहार करणाऱ्या बोगस अडत्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जरे यांनी स्पष्ट केले. मुंबई बाजार समितीतील भाजीपाला व फळ मार्केटमध्ये सध्या विनापरवानाधारकांवर कारवाई सुरू असून, पॅसेज व धक्क्यांवर होणारी अनधिकृत विक्री रोखण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com