मुरबाड-कल्याण महामार्गावरील अमराठी फलक

मुरबाड-कल्याण महामार्गावरील अमराठी फलक
Published on

मुरबाड-कल्याण महामार्गावर अमराठी फलक
मनसेचे तहसीलदारांना निवेदन

टोकावडे, ता. १० (बातमीदार) : नव्याने रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सुरू असलेल्या मुरबाड-कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर लावण्यात येणाऱ्या सूचनाफलकांवर मराठी भाषेचा अभाव असल्याने स्थानिक स्तरावर संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अरुण वारघडे यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

महामार्गावर उभारण्यात येत असलेले दिशादर्शक आणि सूचनाफलक सध्या केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहेत. महाराष्ट्राची राजभाषा असूनही मराठीला या फलकांवर स्थान देण्यात आलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदारांकडून रस्ते कामादरम्यान ही त्रुटी राहिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी लावण्यात येणारे फलक त्यांच्याच भाषेत नसणे ही गंभीर बाब असल्याचे मनसेने म्हटले आहे. निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे, की भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली लागू करावी आणि सध्या असलेल्या अमराठी फलकांचे तातडीने मराठीकरण करावे. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्राच्या मातीत मराठी भाषेला डावलणे खपवून घेतले जाणार नाही. संबंधित विभागाने तातडीने निर्देश देऊन सर्व फलकांवर मराठी भाषेचा समावेश करावा, अन्यथा मनसेस्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष अरुण वारघडे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com