भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाला गती

भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाला गती
Published on

पनवेल, ता. १० (बातमीदार) : तालुक्यात भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्बीजीकरण, लसीकरण व जंतूनिर्मूलन मोहिमेची सुरुवात बुधवारी (ता. ८) आकुर्ली येथे करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्‍घाटन झाले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. तालुक्यात गेल्या काही काळात भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरवर्षी हजारो नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्याला सामोरे जावे लागत असल्याने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठपुरावा केल्यानंतर पनवेल पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाला अरुणशेठ भगत, सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्राची जाधव, आत्माराम भस्मा, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, वैशाली सावंत, अमित जाधव आदी उपस्थित होते.

गटविकास अधिकारी समीर वाठारकर आणि पशुसंवर्धन विभाग यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. ही मोहीम पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती पनवेल, ग्रामपंचायत आकुर्ली आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी यांच्या सहकार्याने राबवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com