तांत्रिक शिक्षकांच्या प्रश्नांवर तोडगा काढा

तांत्रिक शिक्षकांच्या प्रश्नांवर तोडगा काढा
Published on

टोकावडे, ता. १० (बातमीदार) : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांनी मंत्रालयात कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन तांत्रिक व व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. या वेळी त्यांनी सेवानिवृत्तीच्या वेळी शिक्षकांकडून चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या अतिप्रदान रकमेच्या वसुलीचा मुद्दा उपस्थित केला.
वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रुटींमुळे अनेक कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वसुली केली जात आहे. ती तत्काळ थांबवावी आणि आधी वसूल केलेली रक्कम परत देण्याची मागणी म्हात्रे यांनी केली. भविष्यात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारची वसुली करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, २००८ पासून बंद असलेली व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षक भरती तातडीने सुरू करावी, अन्यथा अनेक तांत्रिक शाळा बंद पडण्याचा धोका असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. १६ ऑगस्ट २०१४ च्या शासन आदेशानुसार अशासकीय संस्थांमधील पूर्णवेळ प्रात्यक्षिक शिक्षकांना पदोन्नती देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित संघटनांचे पदाधिकारी, विभागीय अधिकारी आणि मंत्री यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी विनंती आमदार म्हात्रे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com