डोंगरची ‘काळी मैना’ संकटात

डोंगरची ‘काळी मैना’ संकटात
Published on

डोंगरची ‘काळी मैना’ संकटात
विक्रमगडात करवंदांच्या जाळ्यांत घट

विक्रमगड, ता. १० (बातमीदार) : डोंगरातील रानमेव्यांपैकी ‘काळी मैना’ म्हणून ओळख असलेली करवंदे सध्या विक्रमगड तालुक्यात कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी डोंगर-दऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या करवंदांच्या जाळ्या आता झपाट्याने घटत असल्याने रानमेव्याची विक्री करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

करवंदाच्या झाडांना डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत पांढऱ्या रंगाची फुले येतात. त्यानंतर त्यापासून हिरव्या रंगाची फळे तयार होतात आणि एप्रिल ते मे महिन्यात ही करवंदे पूर्णपणे पिकतात. पौष्टिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या करवंदांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तक्षय व पित्तविकारांवर ती उपयुक्त ठरतात. करवंदांपासून सरबत, लोणचे, चटणी अशा विविध खाद्यपदार्थांची निर्मिती केली जाते, ज्यांना बाजारपेठेत चांगली मागणी असते.

कोकणासह विक्रमगड परिसरातील शेतकऱ्यांनी या रानमेव्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. मात्र, तालुक्यात करवंदांवर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारी करवंदे वाया जातात, ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान, जंगलतोड, वारंवार लागणारे वणवे आणि शेती किंवा घरांच्या संरक्षणासाठी काटेरी कुंपण म्हणून करवंदाच्या जाळ्यांचा वापर यामुळे या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. परिणामी, सहज उपलब्ध असलेला हा रानमेवा आता पूर्वीइतक्या प्रमाणात दिसत नाही.
करवंदांच्या जाळ्यांमध्ये होत असलेल्या घटामुळे पुढील काही वर्षांत हा रानमेवा दुर्मिळ होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

--------------
पूर्वी विक्रमगड तालुक्यात करवंदांच्या जाळ्या मोठ्या प्रमाणावर होत्या. करवंदे पिकली की ती विकून अनेक महिलांना रोजगार मिळत होता. मात्र गेल्या चार-पाच वर्षांत जंगलतोड, वणवे आणि कुंपणासाठी होणारा वापर यामुळे करवंदांच्या जाळ्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. अशीच स्थिती राहिली, तर हा रानमेवा काही वर्षांत दुर्मिळ होईल.
- सोपान दिघे
(शेतकरी, विक्रमगड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com