

भिवंडी पालिकेची बाजारपेठेत धडक कारवाई
नगरसेवक, आयुक्तांमधील वादानंतर अतिक्रमण जमीनदोस्त
भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : महापालिका मुख्यालयात झालेली शाब्दिक चकमक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रभाग समिती क्रमांक पाचच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी उशिरा मच्छी-मटण मार्केट परिसरातील अतिक्रमणांवर जेसीबी चालवून रस्ता मोकळा केला.
मच्छी-मटण मार्केट इमारत परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून, पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक फराज (बाबा) बाहुद्दीन यांनी केला होता. या विषयावरून गुरुवारी दुपारी पालिका मुख्यालयात नगरसेवक बाहुद्दीन आणि प्रभाग समितीचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सईद चिवणे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली होती. या वेळी प्रशासनाकडून भ्रष्टाचार होत असल्यानेच कारवाई टाळली जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला होता.
जेसीबीच्या सहाय्याने कारवाई
वादानंतर काही तासांतच प्रभारी सहाय्यक आयुक्त सईद चिवणे आणि बिट निरीक्षक हनुमान म्हात्रे यांनी कर्मचारी व जेसीबीसह मार्केट परिसरात धाव घेतली. मार्केट इमारतीच्या बाहेरील सर्व अनधिकृत दुकाने आणि बांधकामे हटवण्यात आली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोंडीत सापडलेला येथील रस्ता अखेर मोकळा झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.