

आयुक्तांची मुख्य नाल्यांसह सखल भागांची पाहणी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
विरार, ता. १० (बातमीदार) : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सक्षम राहावी, संभाव्य पूरस्थिती टाळता यावी व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी शहरातील विविध भागांचा दौरा करून मुख्य नाल्यांची तसेच सखल भागांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात शहरातील प्रमुख नाले, गटारे, पाण्याचा निचरा होणारी ठिकाणे तसेच दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असलेले सखल भाग यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. या वेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना ही दिल्या.
नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे निश्चित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासह पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता सुनिश्चित करावी, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या. नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे, अडथळे दूर करण्याची प्रक्रिया, तसेच सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची प्रगती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. सर्व नाले व गटारे पावसाळ्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ व मोकळे ठेवण्यावर भर देण्यात आला. तसेच सखल भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त पंपिंग यंत्रणा तयार ठेवण्याचे, आपत्कालीन परिस्थितीसाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवण्याचे तसेच आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्याची सुरुवात महापालिका मुख्यालयाशेजारील नाल्यापासून करण्यात आली. या दौऱ्यात रेल्वे कल्वर्ट क्र. ८३ विरार (प.), म्हाडा इमारत क्र. १४ कल्वर्ट विरार (प.), बोळिंज-खारोडी रस्ता कल्वर्ट विरार (प.), विनय युनिक कल्वर्ट गोकुळ टाऊनशिप, रानपाडा गाव कल्वर्ट, आगाशी पुरापाडा स्मशानभूमी कल्वर्ट, युनिटेक कॉम्प्लेक्स विरार (प.) व जुने विवा कॉलेज येथील सखल भाग, नारंगी गाव रेती बंदर कल्वर्ट, मारंबळ पाडा मार्गे चिखलडोंगरी खाडी, द्वारका हॉटेल परिसर आचोळे, मधुबन कॉम्प्लेक्स गोखीवरे, राजावली पुलाजवळील नाला, गोगटे सॉल्ट परिसर, ओमनगर येथील सखल भाग इत्यादी परिसरात पाहणी करण्यात आली. या दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त (दक्षिण) संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त (उत्तर) दिपक सावंत, महापालिकेचे सर्व उप-आयुक्त, प्रभाग शहर अभियंता, सर्व प्रभाग सहाय्यक आयुक्त, सर्व अभियंते, सर्व आरोग्य निरीक्षक व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.