रायगड निवासी शिक्षक संघाकडून गुणवंतांचा सत्कार

रायगड निवासी शिक्षक संघाकडून गुणवंतांचा सत्कार
Published on

रायगड निवासी शिक्षक संघाकडून गुणवंतांचा सत्कार
तळा, ता. १० (वार्ताहर): रायगड निवासी शिक्षक संघ, तळा यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गायमुख येथे उत्साहात पार पडला.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष कमळाकर चोरगे, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी विजय येलवे, भानू मंचेकर,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, नवोदय व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, आयडॉल शिक्षक तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेले शिक्षक व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतातून अमिष भौड यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे संघटना दिवसेंदिवस प्रगती करत असून भविष्यातही विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com