

कर्मचारी कल्याण संघटनेच्या परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ता. १० : भारतीय टपाल खात्याच्या एससी/एसटी कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीने १४ वी त्रैवार्षिक परिषद नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
या परिषदेच्या उद्घाटन सत्रात विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नितीन राऊत (सदस्य, महाराष्ट्र विधानसभा) तसेच पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात (अर्थतज्ज्ञ व माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग) यांनी मार्गदर्शन केले. तसेच या वेळी नागपूर विभागाचे टपाल संचालक, डॉ. सुधीर जाखेरे, कर्नाटकाच्या टपाल मुख्यालयाचे संचालक संदेश महादेवप्पा, यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी जयराम जाधव यांची सेक्रेटरी जनरल म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. या परिषदेसाठी स्वागत समितीचे सचिव गौतम मेश्राम यांनी समन्वयक म्हणून तसेच महाराष्ट्र सर्कलमधून संपूर्ण पदाधिकारी यांनी आपली जबाबदारी पार पाडत कार्यक्रम यशस्वी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.