विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे

विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे
Published on

विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे
‘सुधा सितारा शिष्यवृत्ती’ कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे यांचे मार्गदर्शन
रोहा, ता.१० (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया हा पालकांचे संस्कार, सातत्यपूर्ण परिश्रम आणि चिकाटी यावर उभा असतो, असे प्रतिपादन ना. अदिती तटकरे यांनी केले. सुदर्शन कंपनीच्या सीएसआर फंडातून आयोजित ‘सुधा सितारा शिष्यवृत्ती’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यात सातत्याने मेहनत घेतल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, विवेक गर्ग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आंचल दलाल यांनी अपयशाची भीती न बाळगता प्रयत्न करत राहण्याचा सल्ला दिला. वनश्री शेडगे यांनी सामाजिक कार्याची प्रेरणा घरातून मिळाल्याचे सांगितले.
सीएसआर उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध होत असून अशा योजनांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

फोटो कॅप्शन : रोह्यात आयोजित कर्यक्रम प्रसंगी ना. अदि

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com