तीन महिन्यानंतर पालिका गटनेता कार्यालय बंद

तीन महिन्यानंतर पालिका गटनेता कार्यालय बंद
Published on

गटनेत्यांची कार्यालये अद्याप बंद
भिवंडी महापालिकेत रंगरंगोटीच्या नावाखाली दिरंगाई

भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेत साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधींची सत्ता आली, महापौर-उपमहापौर निवडले गेले; मात्र तीन महिने उलटूनही विविध राजकीय पक्षांची गटनेता कार्यालये अद्याप बंदच आहेत. यामुळे पालिकेत येणाऱ्या नगरसेवकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), शिवसेना, समाजवादी पार्टी आणि कोणार्क विकास आघाडी यांच्या गटनेत्यांची नियुक्ती कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आली आहे; मात्र दुसऱ्या मजल्यावरील त्यांची कार्यालये अजूनही उघडण्यात आलेली नाहीत. दुसऱ्या मजल्यावरील या कार्यालयांच्या रंगरंगोटीचे आणि फर्निचरचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कार्यालयातील खुर्च्या आणि सोफे बाहेर पॅसेजमध्ये काढून ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण परिसरात अस्ताव्यस्त वातावरण दिसत आहे. कामानिमित्त पालिकेत येणाऱ्या नगरसेवकांना हक्काची जागा नसल्याने, कामाचा आढावा घेऊन त्यांना तातडीने माघारी फिरावे लागत आहे.

प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
महापौर आणि उपमहापौर यांची कार्यालये मार्च महिन्यात सुरू झाली असली, तरी गटनेत्यांच्या कार्यालयांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. पावसाळा आणि आगामी कामांचे नियोजन करण्यासाठी गटनेत्यांना कार्यालयांची तातडीने आवश्यकता आहे.

नगरसेवकांची मागणी
लोकशाहीत लोकप्रतिनिधींना बसण्यासाठी आणि जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी कार्यालयाची गरज असते. नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून ही कार्यालये त्वरित खुली करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com