

ठाण्यात धावत्या दुचाकीला आग
ठाणे, ता. १० : शहरातील पोखरण रोड क्रमांक २ वरील सुभाषनगर परिसरात शुक्रवारी (ता. १०) सकाळी एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने काही वेळातच दुचाकी जळून खाक झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अभिषेक गिरी नामक व्यक्ती आपली दुचाकी घेऊन स्वस्तिक प्लाझा जवळून जात असताना सकाळी ११:४५ च्या सुमारास अचानक इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच दुचाकीने पेट घेतला. ही घटना लक्षात येताच सतर्क नागरिक प्रीती विश्वकर्मा यांनी तातडीने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वर्तकनगर पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक आणि अग्निशमन दलाचे जवान एका फायर इंजिनसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्परतेने पाण्याचा मारा करून काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत दुचाकीचे सांगाड्याशिवाय काहीही उरले नव्हते.
आगीचे कारण अस्पष्ट
आगीत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, चालक वेळेत बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली की अन्य काही कारणाने, याचा तपास आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.