तळा भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांचा फटका

तळा भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांचा फटका
Published on

तळा भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांचा फटका
जमीन मोजणीची कामे ठप्प; ११७ प्रकरणे प्रलंबित
तळा, ता. १० (वार्ताहर) : तळा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक पदे रिक्त असल्यामुळे जमीन मोजणीची कामे ठप्प झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयातील प्रिंटर, लॅपटॉप यांसारखी उपकरणे नादुरुस्त असल्याने कामकाजावर आणखी परिणाम होत आहे.
कार्यालयातील उपअधीक्षक, मुख्य सहाय्यक, भूकरमापक, कनिष्ठ लिपिक, प्रति लिपिक, आवक-जावक लिपिक, नोंदणी लिपिक तसेच दप्तर बंद अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. मुख्य सहाय्यक पदासाठी उमेश शिवाजी दराडे हे सध्या तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर काम पाहत आहेत. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कामाचा ताण वाढला आहे.
भूकरमापकांच्या दोन जागा रिक्त असल्याने विशेषतः दुर्गम डोंगराळ भागातील जमीन मोजणी रखडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाचे फेरे मारावे लागत आहेत. मार्च २०२६ अखेरपर्यंत ११७ मोजणी प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे. मोजणीसाठी शुल्क भरूनही कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी पैसे भरूनही शासनाच्या हलगर्जीपणामुळे वेळेत मोजणी होत नाही. रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी गिरणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर महाडीक यांनी केली.
कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने काम करणे कठीण झाले आहे. पदे भरल्यास कामकाज सुरळीत होईल, असे प्रभारी मुख्य सहाय्यक उमेश शिवाजी दराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com