

पेणच्या खारेपाटात पाण्यासाठी वणवण
१२० वाड्या-वस्त्यांची तहान केवळ १२ टँकरवर
पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागातील पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असून, यंदाही उन्हाळ्याची तीव्रता वाढताच नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. विभागातील १२ मुख्य गावे आणि जवळपास १२० वाड्या-वस्त्यांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने केवळ १२ टँकर लावले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना, पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे.
राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून, पेणच्या खारेपाट भागातील वाशी, वढाव, शिर्की, दिव, मसद, बोर्झे, कणे यासह इतर १२ गावांमधील आणि जवळपास १२० वाड्या-वस्त्यांमधील नागरीक पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पेण पंचायत समितीच्या माध्यमातून पाणीटंचाईच्या आराखड्यासाठी ८७ लाख ८५ हजार मंजूर केले होते. यानुसार मार्च महिन्यापासून खारेपाट भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, तीन-चार दिवसाआड येणाऱ्या टँकरमुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पेणच्या खारेपाटातील नागरिक गेली ४०- ५० वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ असताना येथे टाकलेल्या एमजीपीच्या पाइपलाइनमध्ये अनेक तफावती दिसून येत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांसाठी टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा पर्याय नाही, तर शासनाने येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून खारेपाटाला न्याय मिळवून द्यावा.
- गोरखनाथ पाटील, माजी सरपंच, वाशी ग्रामपंचायत
वाशी खारेपाटात आता १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा एक दिवसाआड होत असताना ज्या गावातील किंवा ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीकडे पत्र उपलब्ध होत आहेत. त्या ठिकाणी तत्काळ पाण्याचा टँकर पाठविण्यात येत आहे.
- सूर्यकांत परब, सहाय्यक अभियंता, पंचायत समिती, पेण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.