दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा

दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा
Published on

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : सानपाडा येथून जुईनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव रिक्षाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. सानपाडा पोलिसांनी या अपघातातील आरोपी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

कृष्णा भास्कर सुतार हा तरुण सानपाडा सेक्टर पाचमध्ये राहण्यास होता. तसेच तो वाशीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करीत होता. सोमवारी (ता. ६) दुपारी कृष्णा दुचाकी घेऊन जुईनगर ते सानपाड्यादरम्यानच्या सेवा रस्त्यावरून सानपाड्याच्या दिशेने जात होता. याच वेळी रिक्षाचालक श्याम आप्पाराव शेट्टे (वय ३९) हा सानपाडा येथून जुईनगरच्या दिशेने जात होता. रिक्षाचालकाने भरधाव वेगाने रिक्षा चालवून कृष्णाच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात कृष्णाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नेरूळमधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना कृष्णा याचा मंगळवारी (ता. ७) मृत्यू झाला. त्यानंतर सानपाडा पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com