मजगाव येथील जुन्या पुलाचे अवशेष ठरले जीवघेणे

मजगाव येथील जुन्या पुलाचे अवशेष ठरले जीवघेणे
Published on

मजगाव येथील जुन्या पुलाचे अवशेष ठरले जीवघेणे
जीर्ण पिलर कोसळण्याची भीती; पावसाळ्याआधी पूल हटवण्याची ग्रामस्थांची मागणी
मुरूड, ता. १० (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील उसरोली ते मजगाव यादरम्यान असलेल्या जुन्या पुलाचे अवशेष सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, ते तातडीने हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या अवशेषांमुळे दुर्घटनेचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
साळाव-मुरूड मार्गावरील उसरोली फाटा ते मजगाव (खारदोडकुले) दरम्यानचा हा पूल सुमारे १५ वर्षांपूर्वी कोसळला होता. त्यानंतर पुलाचा काही भाग हटविण्यात आला असला तरी दगडी पिलर अद्याप जागेवरच आहेत. हे पिलर सध्या जीर्ण अवस्थेत असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या पिलरवर लहान मुले खेळताना दिसत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. काही जण या पडक्या पुलाचा मासेमारीसाठीही वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
याबाबत अनेकदा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपुरी कार्यवाही झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यास हे अवशेष अधिक धोकादायक ठरू शकतात.

चौकट
प्रशासनाची तातडीची गरज
पावसाळ्यापूर्वीच पुलाचे उर्वरित अवशेष हटवले नाहीत, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com