शिक्षकांचे वेतन रखडणार?

शिक्षकांचे वेतन रखडणार?
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : शिक्षण विभागामार्फत शासकीय व अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक; तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही प्रक्रिया राबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘शालार्थ’ प्रणालीतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे मार्चचे वेतन रखडण्याची शक्यता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे ज्या शाळांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अपलोड केलेल्या कागदपत्रांची आवक-जावक नोंदी जुळल्यास त्यांचे वेतन वेळेत होणार असल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.
राज्यभरातील शासकीय अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक; तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने या सर्वांची महत्त्वाच्या चार कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्याचे निश्चित केले आहे. त्याची या वर्षापासून सुरुवात केली आहे. मात्र, शालार्थ प्रणालीतील विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे वेतन प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शाळांचे डिजिटायझेशन पूर्ण न होणे, संचमान्यता दुरुस्ती प्रलंबित राहणे, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन न होणे; तसेच एकाच यू-डायस क्रमांकावर एकापेक्षा अधिक शाळांचे वेतन चालू असणे अशा प्रमुख समस्यांचा समावेश असल्याची माहिती शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.
शाळांनी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालार्थ प्रणालीत अपलोड करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांची शिक्षणाधिकारी स्तरावर पडताळणी केली जाणार आहे. शाळांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांतील तारखा व आवक-जावक नोंदी शिक्षण विभागाच्या नोंदींशी जुळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत दिले जाईल, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी केला आहे.


कमिटी घेणार निर्णय
एखाद्या शाळा प्रशासनाने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर जिल्हास्तरावरील शिक्षण विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. या वेळी कागदपत्रातील नोंदी व आवक-जावक नोंदीत तफावत आढळल्यास ते प्रकरण शिक्षण उपसंचालक स्तरावर नेमलेल्या कमिटीकडे ठेवणार असल्याची माहिती देविदास महाजन यांनी दिली.

कागदपत्रांचे डिजिटलायझेशन
- शाळेने दिलेला नेमणूक आदेश
- कामावर रुजू होण्याचा रिपोर्ट
- शिक्षणाधिकारी यांचा मान्यता आदेश
- शालार्थ आयडी प्रत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com