आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला सर्फिंगचा अनुभव

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला सर्फिंगचा अनुभव
Published on

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला सर्फिंगचा अनुभव
डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत रोमहर्षक उपक्रम

तारापुर, ता. १० (बातमीदार) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वसई समुद्रकिनारी वॉटर सर्फिंगचा अनोखा आणि रोमहर्षक अनुभव घेण्याची संधी मिळाली. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.

मुंबई सर्फ क्लब अँड स्कूल यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रथमच वॉटर सर्फिंग या साहसी जलक्रीडा प्रकाराचा अनुभव घेतला. प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली सर्फिंगचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागाची संधी देण्यात आली. प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी भीतीवर मात करत आत्मविश्वासाने या खेळाचा आनंद लुटला.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आणि त्यांना भविष्यात राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या या विद्यार्थ्यांसाठी अशा संधी अत्यंत मर्यादित असतात. त्यामुळे हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात नवी दिशा देणारा ठरला आहे. वॉटर सर्फिंग आमच्यासाठी नवीन अनुभव होता. सुरुवातीला भीती वाटली, पण नंतर खूप मजा आली. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आमचा आत्मविश्वास वाढला, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. एकूणच, हा उपक्रम आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरला असून, त्यांच्या आयुष्यात साहस, आत्मविश्वास आणि नव्या संधींची प्रेरणा निर्माण करणारा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com