विक्रमगडच्या दहा ग्रामपंचायतींमध्येही पोटनिवडणूक

विक्रमगडच्या दहा ग्रामपंचायतींमध्येही पोटनिवडणूक
Published on

विक्रमगडच्या १० ग्रामपंचायतींमध्येही पोटनिवडणूक

विक्रमगड, ता. १० (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या १० ग्रामपंचायतींमधील सदस्यपदांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. इतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांप्रमाणे येथेही येत्या २८ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तसेच एका ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठीही पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ एप्रिलपासून सुरू झाली असून, १३ एप्रिल रोजी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. दादडे सारशी, आंबेघर (तर्फे धरमपूर), साखरे, खुडेद, सुकसाळे, वेढेचरी, म्हसरोली, उपराळे आणि मोह या ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. याशिवाय खोस्ते ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.

दरम्यान, काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात किती जागा बिनविरोध राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीसाठी साधारण आठ ते १० दिवस प्रचाराला मिळणार असून, गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com