

ओएनजीसीकडून नवघर ग्रामपंचायतीला घंटागाडी सुपूर्द
उरण, ता. १० (बातमीदार) : ओएनजीसी कंपनीकडून सीएसआर निधीतून घंटागाडी प्रदान करण्यात आली आहे. ग्रामपंचायत ग्रुप असल्याने कचरा संकलनासाठी वाहनाची गरज भासत होती. यासाठी सरपंच व सदस्यांनी ओएनजीसीकडे मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत कंपनीने घंटागाडी उपलब्ध करून दिली.
या उपक्रमासाठी अविनाश म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा व समन्वय साधला. ओएनजीसीच्या प्लांटमध्ये नुकताच उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प्लांट मॅनेजर एस. एन. अहमद आणि सपोर्ट मॅनेजर एस. के. मोहन यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीचे उद्घाटन केले.
या प्रसंगी ओएनजीसी अधिकारी अभिषेक पाटील, सरपंच सविता मढवी, उपसरपंच प्रियदर्शनी म्हात्रे, नितीन मढवी, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे व आतिश भोईर उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावातील स्वच्छतेला चालना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.