

आयुक्त निवासासमोर नियमभंग
पदपथावर गार्डन; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
तुर्भे, ता. १० (बातमीदार) : नेरूळ येथील नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानासमोर पदपथावरच गार्डन तयार करण्यात आल्याने अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पादचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या फुटपाथचा मोठा भाग झाडे-झुडपांनी व्यापल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिकेकडून शहरातील पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी मोहीम सुरू असताना आयुक्त निवासस्थानासमोरील या गार्डनवर कारवाई होणार की ‘नियमाला अपवाद’ दिला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या पदपथ रुंद असल्याने तातडीचा अडथळा निर्माण होत नसला तरी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, बेलापूर सेक्टर १५ मधील काही शासकीय कार्यालयांनीही पदपथांवर रेलिंग व लॉन तयार करून सार्वजनिक जागा अडविल्याचे प्रकार समोर आले आहेत. तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने ‘बड्या’ अधिकाऱ्यांपुढे प्रशासन झुकत असल्याची भावना नागरिकांत वाढत आहे.
पदपथ हे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी असतात, शासकीय निवासस्थानांच्या शोभेसाठी नव्हे. आयुक्त निवासस्थानासमोरच नियमभंग होत असेल, तर सामान्य नागरिकांकडून शिस्तीची अपेक्षा कशी करणार, असा सवाल सजग नागरिक मंचाचे सुधीर दाणी यांनी उपस्थित केला आहे.
चौकट :
अतिक्रमणावर कारवाईची मागणी
शहरातील सर्व पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी प्रशासनाने एकसमान नियम लागू करून अशा अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, तसेच स्वतः आदर्श घालून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.