

तुर्भेत संवाद केंद्राची दुरवस्था
मद्यपींचा अड्डा; नागरिकांमध्ये नाराजी
तुर्भे, ता. १० (बातमीदार): लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या संत रामतनुमाता संवाद केंद्राची सध्या दुरवस्था झाली असून, या ठिकाणी मद्यपींचा अड्डा निर्माण झाल्याची धक्कादायक स्थिती समोर आली आहे. स्थानिक नगरसेवक, पोलिस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
तुर्भे गावाच्या वेशीजवळ नवी मुंबई महापालिकेकडून हे संवाद केंद्र उभारण्यात आले होते. संत रामतनुमाता या परिसरातील श्रद्धास्थान असल्याने त्यांच्या नावाने उभारलेले हे केंद्र सामाजिक उपक्रमांसाठी वापरले जावे, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम होत नसून केंद्र ओसाड पडले आहे.
केंद्रासमोरच देशी दारूचे दुकान असल्याने रात्रीच्या वेळी मद्यपी येथे दारू पिऊन गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकदा या ठिकाणी अस्वच्छता पसरत असून, दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे. “धार्मिक नाव असलेल्या या ठिकाणी अशा प्रकारे गैरप्रकार सुरू असणे ही लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई करून येथे शिस्त प्रस्थापित करावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संवाद केंद्रातील लाद्या तुटलेल्या असून, सुशोभीकरणाची हानी झाली आहे. तसेच शेड मोडकळीस आले असून, स्वच्छतेचा अभाव दिसून येतो.
चौकट :
तातडीच्या कारवाईची गरज
या केंद्राची दुरुस्ती करून नियमित देखभाल, सुरक्षा व्यवस्था व सामाजिक उपक्रम सुरू करावेत, तसेच मद्यपींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तुर्भेकरांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.