

अतितीव्र दिव्यांगांना निर्वाह भत्ता मंजूर
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) ः जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाने २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पामध्ये अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे ही नावीन्यपूर्ण योजना समाविष्ट केली. या योजनेसाठी पात्र दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज, प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्ह्यामधून या योजनेसाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून एक हजार ५११ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना १६ हजार रुपये लाभ मंजूर केला आहे.
जिल्हा परिषदेने पाच टक्के दिव्यांग कल्याण सेस निधीमधून या योजनेचा अर्थसंकल्पामध्ये समावेश केला. त्यानुसार या योजनेसाठी लाभार्थी निवडीबाबतचे निकष, अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे आदी निश्चित करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे दिव्यंगत्वाचे प्रमाण ६० किंवा त्यापेक्षा जास्त असणे, जिल्हा शल्यचिकित्सक, सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असणे तसेच अर्जदाराकडे केंद्र शासनाच्या नवीन कायद्यानुसार दिव्यंगत्वाचे यूडीआयडी प्रमाणपत्र बंधनकारक असणे, असे निकष ठरविण्यात आले होते. यानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले. पात्र ठरलेल्या एकूण एक हजार ५११ लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी १६ हजार रुपये रक्कम बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे.
ज्या पात्र दिव्यांगांनी या योजनेसाठी प्रस्ताव दाखल केले होते, त्यांनी आपल्या बँक खात्यावर लाभाची रक्कम जमा झाल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.