

जुईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव
नेरूळ (बातमीदार) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जुईनगरमध्ये १३ व १४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिसूर्य सामाजिक प्रतिष्ठान संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमहोत्सव समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोमवारी (ता. १३) गायक अरविंद मोहिते यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी १० वाजता प्रतिमापूजन होणार आहे. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आदर्श शाखा, बौद्धजन पंचायत समिती व रमाई महिला मंडळ सहभागी असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक रवींद्र सावंत यांनी केले आहे.
----------------------------------------------------------------------
आगरी बोलीतील लघुकथा संग्रह प्रकाशित
नेरूळ (बातमीदार) : नवी मुंबईतील कवी व लेखक गजानन म्हात्रे यांचे ‘आउसी गोस्ट’ हे लघुकथांचे पुस्तक उद्या, रविवारी (ता. १२) रंगधनु प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. आगरी बोलीतील आशयघन कथांचा समावेश असलेले हे त्यांचे बारावे पुस्तक असून, आगरी बोलीवरील चौथे पुस्तक आहे. या प्रकाशन सोहळ्यास रत्नागिरीचे साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे अध्यक्षस्थानी राहणार असून, साहित्यिका कौमुदी गोडबोले व प्रा. प्रतिभा सराफ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम एन. आर. भगत शाळेत होणार आहे.
---------------------------------------------------
भाजप स्थापना दिन साजरा
नेरूळ (बातमीदार) : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेज, नेरूळ येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजप नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जनजागृती, सरकारी योजनांची माहिती आणि सामाजिक बांधिलकीवर भर देण्यात आला. जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. या वेळी मतदान जनजागृती, कार्यकर्त्यांचे कर्तव्य आणि समाजातील सहभाग यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते वसंत सुतार, अभिजित पेडणेकर, नगरसेवक सुरेश शेट्टी, नगरसेविका डॉ. प्रणाली पाटील, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, नीलेश म्हात्रे, माजी महापौर सुषमा दंडे, प्रभाकर भोईर, राजेश राय यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.