महामार्गावर चारोटी उड्डाणपुलावर कंटेनर पलटी

महामार्गावर चारोटी उड्डाणपुलावर कंटेनर पलटी
Published on

चारोटी उड्डाणपुलावर कंटेनर उलटला
कागदाच्या रीम्स सेवा रस्त्यावर कोसळल्या

कासा, ता. १० (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी ६.३०च्या सुमारास कागदाच्या रीमने भरलेला कंटेनर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना घडली. या अपघातात कंटेनरचालक जखमी झाला असून त्याला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कंटेनरमधील मोठ्या प्रमाणातील कागदाच्या रीम्स उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

महालक्ष्मी देवीच्या यात्रेमुळे सध्या उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. गुजरात सेलवास येथून कागदाचे रीम भरून मुंबईकडे जाणारा हा कंटेनर होता. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळासाठी विस्कळित झाली होती. वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली. घटनास्थळी महामार्ग पोलिस व कासा पोलिसांनी दखल घेत बचावकार्य सुरू केले. दोन क्रेनच्या साहाय्याने उलटलेला कंटेनर व पडलेले रीम हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.

धोकादायक वळणाचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, याच उड्डाणपुलावर दोन वर्षांपूर्वी गॅस सिलिंडर वाहतूक करणारे वाहन पलटी होऊन सिलिंडर खाली पडल्याने खाली असणाऱ्या प्रवासी वाहनांना भीषण आग लागून सहा ते सात जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या उड्डाणपुलावरील धोकादायक वळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुलाची उंची वाढल्याने अपघात?
उड्डाणपुलावरील खड्डे, अपुरी दुरुस्ती तसेच सिमेंट काँक्रीटीकरणामुळे पुलाची उंची वाढल्याने पुलावरून वाहने खाली पडत असल्याचे
स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे वाहनांचे संतुलन बिघडत असल्याचीही तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून अपघात रोखावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com