

म्हाडा वर्षभरात १३,०१२ घरे बांधणार
२०२६-२७च्या १७,४३० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : म्हाडा २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात राज्यभरात १३ हजार १२ घरे बांधणार आहे. त्यासाठी तब्बल १० हजार ५८५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तर मुंबईत २,५३८ सदनिकांचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
म्हाडाचा २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. त्यानुसार म्हाडा प्राधिकरणाने २०२५-२०२६ या वित्तीय वर्षाकरिता १२ हजार ३९९.२२ कोटी रुपयांच्या सुधारित व २०२६-२७च्या १७,४३०.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात विविध उत्पन्न गटातील २,५३८ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून त्याकरिता ६,७४७.४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मंडळाअंतर्गत तपशील
- कोकण मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटांतील ५,११२ सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी १,४९७.६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- पुणे मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील ६६५ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट आहे. तर बांधकाम खर्चासाठी ६६४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- नागपूर मंडळाअंतर्गत २००८ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून १,२०६.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील १,४८३ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्याच्या बांधकाम खर्चासाठी २५८.३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- नाशिक मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील २३७ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित असून त्याच्या बांधकाम खर्चासाठी १५१.५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- अमरावती मंडळाअंतर्गत ९६९ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. तर त्याच्या बांधकाम खर्चाकरिता ५९.९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे आमदार निधी/शासन निधीतून करण्यात येणाऱ्या कामांसाठी २७११.९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाअंतर्गत उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी तसेच पीएमजीपी, संक्रमण गाळे व पुनर्रचित इमारतींच्या दुरुस्ती व देखभालकरिता ६६१.७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.